फलटण पंढरपूर रस्त्यावर बरडजवळ अपघातात तीन ठार
- gramasthlive
- Nov 2, 2024
- 1 min read

वृत्तसंस्था सातारा : फलटण-पंढरपूर मार्गावर (पालखी महामार्ग) बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत भरधाव मोटारीची कंटेनरला धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
विजापूर येथून पाडेगाव खंडाळा येथे येत असताना बरडगावच्या हद्दीत भरधाव मोटारीची पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला धडक झाली. या अपघातात सागर रामचंद्र चौरे (पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (खेड बु., ता. खंडाळा,) नीलेश चंद्रकांत शिर्के (वेटणे, ता. खटाव, मूळ रा. खटाव, ता. खटाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते सर्वजण विजापूर (कर्नाटक) येथे बंद पडलेला ट्रक दुरुस्त करण्यासाठी मोटारीतून विजापूर येथे गेले होते. काम आटोपून परतीच्या प्रवासात पहाटे बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरने धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मोटारीतील तिघा गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Comments