top of page
Search

धर्मांतर केल्यास एससी कोट्यातून आरक्षण मिळणार नाही; अनुसूचित जाती आयोग

  • Writer: gramasthlive
    gramasthlive
  • Nov 4, 2024
  • 1 min read

:

धर्म बदलणाऱ्या दलितांना यापुढं मोठा धक्का बसणार आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यास एनसीएससी अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं विरोध दर्शवला आहे

एनसीएससीचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनीआपली भूमिका स्पष्ट केली. कलम ३४१ अन्वये संविधान (अनुसूचित जमाती) आदेश, १९५० नुसार हिंदू, शीख किंवा बौद्ध वगळता इतर कोणत्याही धर्माचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जाती समुदायाचं सदस्य मानलं जाऊ शकत नाही. १९५० च्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार, केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध समुदायातील दलितांना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट केलं जाऊ शकतं


आरक्षण व्यवस्था जातीनिहाय आहे. ज्यांनी धर्मांतर केलं आहे ते आता हिंदू नाहीत, त्यामुळं राज्यघटनेच्या व्याख्येनुसार त्यांचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. हे राज्यघटनेच्या भावनेच्या विरोधात आहे. धर्मांतर करणाऱ्या दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा दिल्यास धर्मांतराला प्रोत्साहन मिळेल आणि तो हा एससी समाजातील लोकांवर मोठा अन्याय ठरेल, असं किशोर मकवाना म्हणाले.

धर्मांतर करणाऱ्यांना अनुसूचित जातीचा दर्जा दिला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या प्रयत्नांना काहीच अर्थ राहणार नाही, असं मकवाना यांनी म्हटलं आहे. हा आंबेडकर आणि संपूर्ण एससी समाजाचा विश्वासघात ठरेल. धर्मांतर केलेल्या दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, अशी मागणी अनेक दलित संघटना करत असेल आहेत


 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page